वाढदिवशी केक कापणे ही आपली संस्कृती आहे का? अमिताभ यांचा प्रश्न
महा एमटीबी   24-May-2018

 
 
मुंबई : आपल्या घरात, आजू बाजूला आणि तसेच इतरत्र सगळीकडे वाढदिवस म्हटले ही 'हॅप्पी बर्थडे टू यू' हे गाणे नेहमीच ऐकू येते. तसेच वाढदिवशी केक कापणे आता सगळीकडे सर्रास दिसून येते. मात्र वाढदिवशी केक कापणे, मेणबत्ती फुंकणे ही काही आपली संस्कृती नाही, असे आणखी कुणीनाही तर बॉलिवुडचे शहंशाह 'अमिताभ बच्चन' यांनी सांगितले आहे. आज ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
 

 
 
 
 
 
"आपल्या संस्कृतीत दीप प्रज्ज्वलित करणे शिकवतात, यामुळे नवीन तेज नवीन प्रकाश मिळतो. इंग्रजांच्या संस्कृतीत मेणबत्ती फुंकण्याला महत्व असेल पण आपल्या संस्कृतीत ते नाही. इंग्रज गेले मात्र त्यांच्या काही गोष्टी मागे ठेवून गेले, ज्या आपण आज देखील पाळत आहोत." असेही ते म्हणाले आहे. त्यांनी आपल्या वडीलांची म्हणजेच हिंदी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवि हरिवंश राय बच्चन यांची कविता शेअर करत सांगितले की, "आमच्या घरी कुणाचाही वाढदिवस असला की आम्ही हे गीत म्हणतो."
 
या गीताचे बोल आहेत :

वर्ष नव,
हर्ष नव,
जीवन उत्कर्ष नव।
नव उमंग,
नव तरंग,
जीवन का नव प्रसंग।
नवल चाह,
नवल राह,
जीवन का नव प्रवाह।
गीत नवल,
प्रीत नवल,
जीवन की रीति नवल,
जीवन की नीति नवल,
जीवन की जीत नवल!

- हरिवंशराय बच्चन
 
 
 
अमिताभ यांनी एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे. भारताच्या संस्कृतीत, परंपरेत कुठेही दिवा विझवण्यास सांगितले नाही, तर आपल्या येथे वाढदिवशी औक्षवणाची परंपरा आहे, ज्यामध्ये आपली आई किंवा घरातील वडील व्यक्ती आपल्याला दिव्याने ओवाळते. आपली संस्कृती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात दिवा लावून त्याला प्रकाशमान करणारी आहे. तर एखाद्यावर गुलामगिरी करणे म्हणजेच असलेले दिवे विझवून स्वत:चे राज्य स्थापित करणे असे म्हणता येईल. भारतीय परंपरेत वाढदिवशी मोठ्यांना नमस्कार करुन आशिर्वाद घेण्याची पद्धत आहे, देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. केक कापण्याची क्रेझ वाढली जरी असली आणि ते आवडत जरी असले तरी देखील ती परंपरा आपली नाही, हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण कुणाचे ऐकायचे ? आपल्यावर इतके वर्ष गुलामगिरी करणाऱ्या इंग्रजांचे की आपल्या लाडक्या अभिनेत्याचे? हे आपण ठरवायचे आहे.