एबी डिव्हीलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
महा एमटीबी   23-May-2018केपटाऊन : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असलेला खेळाडू एबी डिव्हीलियर्स याने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमधून आपण कायमची निवृत्ती घेत असल्याचे आज त्याने जाहीर केले आहे. डिव्हीलियर्स नुकत्याच काही वेळापूर्वी सोशल मिडियावरून याविषयी घोषणा केली असून डिव्हीलियर्स अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्व चाहत्यांमध्ये सध्या दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकताच डिव्हीलियर्स याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या चौदा वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या या कार्यकाळामध्ये ११४ कसोटी सामने, २२८ एकदिवसी सामने, आणि ७८ टी-२० सामने खेळले असून यामध्ये आपला संघ आणि आपल्या चाहत्यांनी आपल्याला कायम उत्तम साथ दिली आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे हे आपल्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे. परंतु आता या आपण थकलो असून या सर्वांमधून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे सांगत आपण निवृत्ती घेत असल्याचे त्याने जाहीर केले आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपण निवृत्ती जरी घेत असलो तरी आपल्या चाहत्यांसाठी आणि संघाच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर असू, असे आश्वासन देखील त्याने दिले आहे.


आपल्या चौदा वर्षांच्या कारकीर्दीमध्ये डिव्हीलियर्स याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण २० हजार १४ धावा केलेल्या आहेत. यामध्ये कसोटी सामन्यातील ८ हजार ७६५, एकदिवसी सामन्यांमधील ९ हजार ५७७ आणि टी-२० सामन्यांमधील १ हजार ६७२ धावांचा समावेश आहे. दरम्यान भरतील इंडियन प्रेमियर लीगच्या गेल्या सर्व सत्रांमध्ये देखील तो खेळलेला आहे. यंदाच्या आयपीएल सत्रामध्ये डिव्हीलियर्स हा बेंगळूरू संघामधून खेळला होता. परंतु बेंगळूरू संघाच्या यंदाच्या खराब प्रदर्शनामुळे त्याने आपल्या चाहत्यांची माफी देखील मागितली होती. तसेच पुढील वर्ष आपण याहून अधिक चांगले प्रदर्शन करून असे आश्वासन देखील त्याने आपल्या चाहत्यांना दिलेले आहे.


Thanks to all our fans for always standing right behind us! #RCB

A post shared by AB de Villiers (@abdevilliers17) on