पंतप्रधनांच्या ‘हम फिट तो इंडिया फिट’ अभियानाचे बॉलीवूडकडून कौतुक
महा एमटीबी   23-May-2018
 
 
 
 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हम फिट तो इंडिया फिट’ नावचे अभियान सुरु केले आहे. या अभियानाचे कौतुक बॉलीवूडने देखील केले आहे. अभिनेता हृतिक रोषन याने या अभियानाचे मनभरून कौतुक करत या अभियानाला प्रोत्साहन द्या असे नागरिकांना म्हटले आहे. आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली तर आपोआपच आपली कामे आणि तब्येत चांगली राहील असे यामध्ये हृतिक म्हणाला आहे. 
 
 
 
 
 
स्वत:च्या ट्वीटरवरून हृतिकने एक व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने या अभियानाचे कौतुक करत तुम्ही देखील माझ्यासारखे फिट रहा असे म्हटले आहे. तसेच तुम्हाला वाहनकोंडीपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही सायकल वापरू शकता असा संदेश त्याने या व्हिडीओमार्फत दिला आहे. सायकलमुळे व्यायाम आणि शारीरिक कसरत होते त्यामुळे सायकल वापर असे म्हणत त्याने या अभियानाला प्रोत्साहन दिले आहे.