२४ वर्षांनंतर पुन्हा एकदा "लो चली मैं" : माधुरी - रेणुकाचा हा व्हिडियो नक्की बघा
महा एमटीबी   20-May-2018
 
 
 
मुंबई :  तब्बल २४ वर्षांआधी म्हणजेच १९९४ मध्ये आलेला चित्रपट "हम आपके हैं कौन" खूप गाजला होतं, त्याचं कारण म्हणजे माधुरी. आणि त्याकाळी रेणुका शहाणे आणि माधुरी दिक्षीत यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं "लो चली मैं अपने देवर की बारात ले के" हे गाणं प्रत्येकाच लग्नाकार्य, समारंभांमध्ये दिसून वाजवण्यात यायचं. प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या गाण्यावर तब्बल २४ वर्षांनंतर रेणुका आणि माधुरी पुन्हा एकदा नाचल्या आहेत. आणि त्यांचा हा व्हिडियो पाहुन प्रेक्षतकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य नक्कीच येणार.
 
 
 
 
 
"बकेट लिस्ट" या आगामी मराठी चित्रपटातून रेणुका आणि माधुरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अचानक "लो चली मैं" हे गाणं लागलं आणइ माधुरी आणि रेणुका यांनी नृत्य सुरु केलं. हा व्हिडियो म्हणजे "हम आपके कौन" च्या चाहत्यांसाठी परवणीच आहे.
 
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून हा विडियो शेअर केला आणि अचानक संपूर्ण इंटरनेटवर हा व्हिडियो व्हायरल झाला आहे. माधुरी आणि रेणुका १४ वर्षात खूप बदलल्या असल्या तरी त्यांच्यातील "केमेस्ट्री" आणि या गाण्यावरची त्यांची छाप अद्यापही तशीच आहे. पुन्हा एकदा या गाण्याला जगण्यासाठी हा व्हिडियो एकदा नक्कीच बघा.