चित्रपट निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या
महा एमटीबी   20-May-2018
 
 
 
सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आतड्याच्या कर्करोगाने ग्रस्त होते, या रोगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
 
 
 
 
 
 
कल्याण पडाल (वय ३८) यांनी सोलापूर येथे राहत्या घरी गळफास घेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतड्याच्या कर्करोगानंतर त्यांना काविळ देखील झाली होती, कर्करोग शेवटच्या स्थितीत असल्या कारणाने त्यांची प्रकृती सुधारत नव्हती, याला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
'म्होरक्या' या चित्रपट अद्याप प्रेक्षकांच्या समोर आलेला नाही, मात्र या चित्रपटाला नुकतेच राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाविषयी सगळ्यांना खूप उत्सुकता होती. मात्र त्यांच्या अचानक झालेल्या या निधनाने हा सिनेमा वेळेत प्रदर्शित करण्यात येईल का त्याची तारीख पुढे ढकलली जाईल याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.