भ्रष्टाचार नष्ट करायला भावेश जोशी लवकरच येतोय.....
महा एमटीबी   02-May-2018
 
 
 
 
 
आता हा भावेश जोशी कोण आहे? आणि हा भ्रष्टाचार नष्ट करायला कसा काय येतो आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. मात्र भावेश जोशी नावाचा चित्रपट येणार असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात काही सामाजिक प्रश्नांवर तीन मित्र उपाय करण्याचा प्रयत्न करतात आणि हे उपाय करीत असतांना त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचे चित्रण या चित्रपट केले आहे. 
 
 
 
 
 
दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवने याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि चेहऱ्यावर एका कागदी पिशवीच्या मदतीने आपला चेहरा लपवून लोकांचे समाजप्रबोधन करणे आणि लोकांनी लक्ष दिले नाही तर त्यांच्यावर बंदूक ठरून त्यांना जबरदस्तीने काम करायला लावणे अश्या काहीश्या विक्षिप्त कल्पना काढून समाजप्रबोधन करणे असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. 
 
 
 
हा चित्रपट २५ मे ला प्रदर्शित होणार आहे. तुम्ही देखील एकदा हा ट्रेलर जरूर पहा आणि विचार करा...