आता अल्लाउद्दीन खिलजीच्या वेशात हा कोण नवीन अभिनेता?
महा एमटीबी   19-May-2018
 
 
 
 
 
 
पद्मावत या चित्रपटातील अल्लाउद्दिन खिलजीची भूमिका करणारा रणवीर सिंग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला असून आता मात्र अल्लाउद्दिन खिलजीच्या भूमिकेत हा कोण नवीन अभिनेता दिसत आहे हे पाहून तुम्ही देखील कोड्यात पडले असाल. हा अभिनेता रणवीर सिंग नसून अभिनेता रवी दुबे हा आहे. 
 
 
 
 
 
रवी दुबेचा नवीन कार्यक्रम 'सबसे स्मार्ट कौन'? हा कार्यक्रम 'स्टार प्लस' या वाहिनीवर येणार असून त्याने या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली आहे. यावेळी त्याने अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत जावून या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली आहे. किस चिड़िया के सर पर पैर होते हैं??? असा प्रश्न विचारात त्याने सगळ्यांना शब्द कोड्यात टाकले आहे. तुम्ही देखील पहा कसे अल्लाउद्दीन खिलजी शब्द कोड्यात टाकतो.