कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये श्रीदेवी यांना सन्मान
महा एमटीबी   18-May-2018

 
 
कान्स फिल्म फेस्टिव्हल हा नावाजलेला चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या अभिनेत्र्यांच्या 'लुक' विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येते. मात्र आता या चित्रपट महोत्सवाची चर्चा करण्यामागचे कारण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चित्रपट सृष्टीतील कार्याला मरणोपरांत कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारापैकी कुणीही उपस्थित नसल्या कारणाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
 
 
 
श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कामाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते, यामध्ये राष्ट्रीय पुरस्काराचा देखील समावेश आहे, जो त्यांना 'मॉम' या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आले.
Titan Reginald F. Lewis या पुरस्काराने त्यांना कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सुभाष घई यांनी श्रीदेवी यांच्या आठवणी आणि त्यांच्या कामाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.