राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचे वितरण
महा एमटीबी   16-May-2018
 
 
 

 
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. आज नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मार्च २०२० मध्ये भारत ३६ वे आंतरराष्ट्रीय भूविज्ञान काँग्रेस परिषदेचे आयोजन करेल. ही जगातील सर्वात मोठी भूविज्ञान परिषद ठरणार आहे. भूविज्ञानशास्त्रात भारताची महत्त्वपूर्ण कामगिरी दाखविण्यासाठी या संधीचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्या असे आवाहन रामनाथ कोविंद यांनी यावेळी केले. 
 
 
 
 
 
पृथ्वीचे मानव दिवसेंदिवस खनन करत आहे मात्र यामुळे नैसर्गिक संसाधन नष्ट होत आहेत. यामुळे आपण याची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच खनन करतांना काही भागात आदिवासी लोक आणि जनजीवन तेथे स्थापित झालेले असते त्यामुळे त्यांच्या घरांचा विचार करून खनन करावे असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. यावेळी रामनाथ कोविंद यांनी २०१७ चे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचे वितरण केले. 
 
 
 
 
 
खाणकाम करण्याऱ्या कामगारांच्या जीवाचा देखील विचार करायला हवा. त्यांच्यामुळे खनिज आपल्याला मिळतात मात्र त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही कंपनीची जबाबदारी आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.