सरकारच्या निर्णयाचे मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून स्वागत
महा एमटीबी   16-May-2018

 
 
श्रीनगर : जम्मू काश्मीर येथे रमझानच्या महीन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात येईल असा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
  
 
 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या आदेशाची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली. मेहबूबा मुफ्ती यांच्या या मागणीवरुन मोठ्या चर्चेला उधाण आले होते. त्यांच्या या मागणीवर सोशलमीडियातून टीका देखील करण्यात आली. "दहशतवादाला धर्म नसतो, तर मग मेहबूबा मुफ्ती यांनी अशी मागणी का केली?" "केवळ रमझानच्याच महीन्यात अशी मागणी का? दिवाळी दसऱ्याला अशा मागण्या का करण्यात येत नाहीत ? " अशा प्रकारचे अनेक प्रश्न नेटीझन्सने उपस्थित केले आहेत.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्याचा अधिकार :

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, रमझानच्या माहिन्यात सुरक्षा यंत्रणा जम्मू काश्मीरमध्ये कोणतीही नवी कारवाई करणार नाहीत. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्याचा अधिकार सुरक्षा यंत्रणेकडे असेल, अशी माहिती मेहबूबा यांनी दिली आहे.