शहाद्यात कंटेनरची दुचाकीला धडक, अभियंता ठार
महा एमटीबी   16-May-2018
शहादा, १६ मे : 
प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील केदारेश्‍व मंदिराच्या वळणावर कंटेनरने दुचाकिला धडक दिली यात युवा अभियंता ठार झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला.
 
 
कवळीथ ता.शहादा येथिल प्रितेश राजेंद्र पाटील वय २७ हा खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. सकाळची शिप्ट असल्याने तो दुचाकी क्र. एमएच ३९ टी ८३५० ने नंदुरबारच्या दिशेने येत असतांना कंटेनरला वळण घेता न आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून प्रितेश यांच्या दुचाकीला धडक दिली.यात दुचाकी चालक कंटेनरच्या चाकात अडकून काही फुट फरफटत गेला.
 
 
ही घटना घडून पोलिसांनी कंटेनर चालकास पकडण्यास ढिसाळपणा केला म्हणून संतप्त नागरिकांनी प्रकाशा - तापी पुलावर काही वेळ रास्ता रोको केला.