बीएस येडीयुरप्पा यांनी घेतली राज्यपाल यांची भेट
महा एमटीबी   16-May-2018
 
 
 
 
 
कर्नाटक : भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक येथील मुख्यमंत्री पदाचे दावेदार बीएस येडीयुरप्पा यांनी आज सकाळी राजभवनात कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई यांची भेट घेतली असून यावेळी येडीयुरप्पा यांनी १०४ आमदारांचे समर्थन पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजर राज्यपाल वजुभाई यांच्याकडे लागली आहेत. 
 
 
 
आज येडीयुरप्पा यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेतात तसेच कोणाच्या हातात कर्नाटक राज्याची सूत्रे देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जेडीएसने कालच आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र भाजपच्या बाजूने जनतेचा कौल असल्याने येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 
 
 
 
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. काल कर्नाटक विधानसभा निवडणूकिसाठीची मतमोजणी झाल्याने आता पहिल्या स्थानावर भाजप तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेस पक्ष आणि तिसऱ्या स्थानावर जेडीएस  आला आहे. जर काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही तर काँग्रेसला २०१९ च्या निवडणुका कठीण जातील असे मत सध्या मांडले जात आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात यावर कर्नाटकाचे भवितव्य अवलंबून आहे.