एस.एस. अहलुवालिया यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
महा एमटीबी   16-May-2018
 
 
 
 
नवी दिल्ली : एस. एस. अहलुवालिया यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले यावेळी एस. एस. अहलुवालिया यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज त्यांनी हा कार्यभार स्वीकारला आहे. 
 
 
 
 
 
याच मंत्रिमंडळीय बदलत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून केंद्रीय क्रीडा मंत्री आणि कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यवर्धन राठोड हे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. 
 
 
 
 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे किडनी प्रत्यारोपण झाले असल्याने त्यांचा काही भार कमी करण्यासाठी पियुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.