आपले सरकार सेवा केंद्रचालकांचे काम बंद आंदोलन
महा एमटीबी   15-May-2018
 
 
आपले सरकार सेवा केंद्रचालकांचे काम बंद आंदोलन
जळगाव, १५ मे
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात काम करणार्‍या ग्रामपंचायतीमधील संगणक परीचालकांचे फेब्रुवार २०१७ पासूनचे मानधन प्रलंबित असल्याने जळगाव जिल्हयातील सर्व संगणक परिचालक बुधवार १६ पासून कामबंद आंदोलन महाराष्ट् राज्य ग्रा.प. संगणक परिचालक संघटना जळगाव करत आहे.
 
 
यातील काही संगणक परीचालकांना डिसेंबर २०१६ पासून एकही मानधन मिळालेले नाही.यास सीएससी एसपीव्ही कंपनीचे व्यवस्थापन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. मानधन मिळाले नसल्याने संगणक परीचालकांवर शेतकर्‍यांप्रमाणे आत्महत्त्येची वेळ आली आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या शासन निर्णयातील जाचक अटीमुळे बर्‍याच केंद्र चालकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड आली आहे. थकित मानधनाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.परंतु आमच्या मागण्यांकडे जाणिवपुर्वक र्दुलक्ष करण्यात येत आहे.
 
 
संग्राम प्रकल्प संपल्यानंतर यातील सर्व संगणक परीचालकांना आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात सामावून घेण्याबाबत ग्राम विकास मंत्री मुंडे यांच्याकडून आश्‍वासने मिळाली परंतु प्रकल्प सुरु हावून दीड वर्षे होत आले तरी प्रकल्पात सामावून घेण्यात आले नाही.संगणक परीचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज रात्र-रात्र भर जागून भरले आहे. तरी आम्हाला मानधन मिळालेले नाही म्हणून बुधवार पासून काम बंद करत असल्याचे निवेदन संघटनेमार्फत जि.प. व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
 
 
यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव जितेंद्र माळी, उपाध्यक्ष प्रमोद चौधरी, संपर्कप्रमुख सुरेश बोहरे, संजय तायडे, मयुर बोरवले, महेंद्र पाटील, सुनिल बिरारी, रामचंद्र पाटील, श्रीकांत बारी आदी उपस्थित होते.