माझ्या आत रक्त असे पर्यंत मी राहुल गांधींसोबत असणार : नवज्योत सिंह सिद्धू
महा एमटीबी   15-May-2018

 
 
नवी दिल्ली :  जो पर्यंत मझ्या आत रक्त वाहतंय तो पर्यंत मी, नवज्योत सिंह सिद्धू राहुल गांधी यांच्या सोबत उभा राहणार, असे ठाम वक्यव्य आज पंजाब येथील काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले. आज सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंह सिद्धू यांनी "रोड रेज"च्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली त्यानंतर ते बोलत होते.
 
यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणूकीवर भाष्य करत त्यांनी , "युतीचे सरकार स्थापन करत राहुल गांधी यांना कर्नाटक येथे यश मिळण्याची शक्यता आहे." असे वक्तव्य केले. आज कर्नाटक निवडणूकीविषयी सगळीकडे चर्चा होत असताना यावर सिद्धू यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
सिद्धू यांना आज एका ३० वर्ष जुन्या रोड रेजच्या प्रकरणातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र आता त्यांना तुरुंगात जावे लागणार नाही. त्यांना केवळ १ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असून ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले आहेत.