अमिताभ बच्चन चाहत्यांपुढे नाचतात तेव्हा...
महा एमटीबी   14-May-2018
 
 
 
 
 
 
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन नेहमी आपल्या मुंबईच्या राहत्या घरी ‘जलसा’ येथे महिन्यातील रविवारी त्यांच्या चाहत्यांना दर्शन देत असतात. काल देखील अश्याच काहीश्या वेगळ्या अंदाजात अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांपुढे आले आणि चाहत्यांना आनंद झाला. अमिताभ बच्चन आल्याबरोबर चाहते त्यांच्या नावाने ओरडू लागले हे पाहून अमिताभ बच्चन यांना देखील राहवले गेले नाही.
 
 
तुम्ही देखील पहा बिग बी चां हा अंदाज.. 
 
                                                                                
 
 
मग काय ‘बिग बी’ देखील गाण्याच्या चालीवर चक्क नाचू लागले. अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘१०२ नॉट आऊट’ या गाण्यावर ते नाचू लागले. त्यांना नाचते पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला आणि ते देखील त्यांना प्रोत्साहन देवू लागले. अमिताभ बच्चन दरवेळी चाहत्यांना भेटतात तेव्हा काही तरी वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांपुढे येत असतात. त्यामुळे आता ते या अंदाजात आपल्याला दिसले आहे.