मालेगावचे शिकारी पाचोर्‍यात जेरबंद
महा एमटीबी   14-May-2018
 
 पाचोरा, १४ मे :
निलगायीच्या शिकारीसाठी आलेले मालेगाव येथील ७ जणांसह ४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालेगाव येथील शिकारी पाचोरा-जामनेर रस्त्यावरील कोकडीतांडा येथे शिकारीसाठी सर्व सामुग्री आणि चारचाकीसह येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शामकांत सोमवंशी, यांनी रविवाररोजी सायंकाळपासून यामार्गावरील प्रमुख चौकात नाकाबंदी केलही. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एमएच १५ बीडब्लू ५४२३ ही चारचाकी पोलीसांनी अडवली असता चालकाने नाकाबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करुन पकडले असता गाडीच्या तपासणीत नीलगायीच्या मासांचे तुकडे, बारा बोअरची बंदूक, १६ जिवंत काडतुस, वापरलेल्या काडतुसांचे ५ खोके, कुर्‍हाड , सर्च लाईट असे साहित्य आढळून आले.
 
 
याप्रकरणी वहिवदू मोहम्मद यासीन, मोहम्मद जाफर, आरिफ अहमद, शहजाद इकबाल, रशीद अहमद, जमील अहमद, शेख शकुर सर्व राहणार मालेगाव यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.