'मदर्स डे' च्या निमित्ताने सुदर्शन पटनाईक यांच्या पंतप्रधानांच्या आईंना शुभेच्छा
महा एमटीबी   13-May-2018
 
 
जगन्नाथ पूरी :  आज जागतिक माता दिन म्हणजेच 'मदर्स डे'. या निमित्ताने प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या अत्यंत सुंदर भावना दाखवणारी कलाकृती सुदर्शन पटनाईक यांनी साकारली आहे. 
 
 
 
 
या कलाकृतीवर त्यांनी "माँ की ममता" असे लिहीले आहे. सुदर्शन पटनाईक यांनी दर वेळीच वेगवेगळ्या घटनांवर वाळूच्या कलाकृतीच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पूरीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी ही कलाकृती साकारली आहे, आणि या कलाकृतीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात येत आहे. 
 
 
 
 
या शिवाय मदर्स डे निमित्त पटनाईक यांनी आणखी एक कलाकृती साकारली आहे, ज्यामध्ये आई आणि छोटे बाळ आहे, तसेच "We love you" असे लिहीले आहे. सुदर्शन पटनाईक यांच्या कलाकृतीविषयी केवळ देशातच नाही तर देशाबाहेर देखील चर्चा करण्यात येते.