२०२० मध्ये मंगळावर पहिले हेलिकॉप्टर नासा पाठवणार
महा एमटीबी   12-May-2018
 
 
 
 
 
अमेरिका : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ लवकरच मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार असून ही माहिती नासाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. नासा नेहमीच मंगळ मोहिमेसाठी सज्ज असतो त्यामुळे आता मंगळावरील अनेक भागांचा अभ्यास करण्यासाठी नासा मंगळावर हेलिकॉप्टरने संशोधन करणार आहे. एका उपग्रहाच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असून या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नासा मंगळवारी करणार आहे. 
 
 
 
 
 
नासा ही मोहीम २०२० मध्ये पूर्ण करणार असून आता नासाने याविषयी माहिती देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हे हेलिकॉप्टर कसे काम करणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. अतिशय सोप्या शब्दांत नासाने ही माहिती दिली आहे. नासा सध्या या मोहिमेवर अभ्यास करत असून यासाठी उपग्रह निर्मित करीत आहे. अशी माहिती नासाने दिली आहे.