भारत आणि नेपाळ यांचे संबंध भाषेमुळे बांधले आहे : नरेंद्र मोदी
महा एमटीबी   11-May-2018
 
 
 
 
 
जनकपुर : भारत आणि नेपाळ या दोन्ही राष्ट्रांचे संबंध भाषेमुळे बांधले गेले आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर गेले असून आज जनकपुर येथे जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. धार्मिक, सामाजिक आणि आपलेपणाच्या भाषेमुळे हे दोन्ही देश एकत्र जोडले गेले असून या दोन्ही देशांची धार्मिक, सामाजिक संस्कृती एकच आहे असे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
 
 
 
 
 
 
 
भारत आणि नेपाळ हे दोन देश असले तरी देखील, या दोन्ही देशांची मैत्री आजच्या काळापासून नाही तर त्रेतायुगापासून आहे. राजा जनक आणि राजा दशरथ यांनी केवळ अयोध्या आणि जनकपुरच नाही तर भारत आणि नेपाळलाही मैत्री आणि भागीदारीच्या बंधनात बांधले असे ते यावेळी म्हणाले. मिथिला संस्कृतीचे साहित्य, लोककला, स्वागत पद्धत ही अद्भूत असून संपूर्ण जगात मिथिला संस्कृतीचे स्थान खूपच मोठे आहे असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हटले.