भातखळकरांना नागरिकांच्या समस्यांची जाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

                      

 
मुंबईतील कार्यक्रमात चंद्रकांतदादा पाटील यांची स्तुतीसुमने
 
 

मुंबई: आ. अतुल भातखळकर यांना नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. एखादी गोष्ट हाती घेतली तर ती पाठपुरावा करून ध्येयापर्यंत पोहोचवण्याची कला त्यांच्याकडे आहे,” असे सांगत बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्तुतीसुमने उधळली. मुंबईतील कांदिवली परिसरात आ. अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून नागरिकांच्या सोयीसाठी बस स्थानक उभारण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांतदादा बोलत होते. यावेळी खा. गोपाळ शेट्टी, आ. भाई गिरकर, आ. प्रविण दरेकर, आ. योगेश सागर, आ. मनिषा चौधरी आणि अन्य मान्यवरदेखील उपस्थित होते. तसेच यावेळी मान्यवरांच्या उपस्थिती भातखळकर यांनी अनुवाद केलेल्या मार्चिंग विथ द बिलियन’ या पुस्तकाचे अनावरणदेखील करण्यात आले.

सर्वसामान्यांच्या गरजा ध्यानात घेऊन करण्याची गरज लोकप्रतिनिधींना असते. परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन भातखळकरांनी बस स्थानकाची उभारणी केली हे कौतुकास्पद असल्याचे पाटील म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी परिसरात राबविण्यात येणार्‍या अन्य विकासकामांचीदेखील माहिती दिली. या ठिकाणी असलेल्या सलिम कंपाऊंड परिसरात भव्य क्रीडा भवन साकारण्यात येणार असून महसूल विभागाच्या जागेवर सदर क्रीडा भवन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासाठी १० कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच येत्या काळात सरकारी जागांवर उभ्या असलेल्या घरांना त्या जागा हस्तांतरीत करण्याचा विचार सुरू असून त्या क्लास १ मध्ये आणण्यात येणार आहेत. तसेच याबाबत महिन्याभरात कायदादेखील करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. येत्या काळात म्हाडाला लागणारा एनए टॅक्सदेखील कमी करण्यावर विचार सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

अधिकार्‍यांकडून काम करून घेणे कठीण काम

शासकीय आणि प्रशासकीय अधिका़र्‍यांकडून काम करून घेणे हे कठीण काम असून गेल्या २6 वर्षां याचा अनुभव आपल्याला आल्याचे खा. गोपाळ शेट्टी यांनी यावेळी सांगितले. अधिकार्‍यांनी नागरिकांचे काम न करू देण्याची शपथ घेतली आहे, मात्र लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे काम करूनच द्यायचे अशी शपथ घेतली असून त्यांना लोकप्रतिनिधींची साथ असल्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी त्यांनी भातखळकरांची स्तुती करत अशा प्रकारचे नागरिकांसाठी उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक रोजगार निर्माण होतील, त्यामुळे असे अनेक उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच कार्यक्रमादरम्यान पुरूषोत्तम राजपूत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊनच विचार

उन्हा तान्हात, पावसापाण्यात या ठिकाणी बससाठी उभ्या राहणार्‍या प्रवाशांना होणारा त्रास पाहून ही संकल्पना आपल्या ध्यानात आल्याचे भातखळकर यावेळी म्हणाले. बस स्थानक उभारतेवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, चंद्रकांतदादांची साथ आणि पाठपुराव्यामुळे यातून मार्ग निघून भव्य असे बस स्थानक उभारण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. तसेच येत्या काळात परिसरात अनेक विकासकामे जोर धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये ११ एकर जागेवर भव्य अँपी थिएटर, हनुमान नगर परिसरात समाज मंदिर, अशोक नगर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस स्थानक, ठाकुर कॉम्प्लेक्स परिसरात जॉगर्स पार्क आणि आकुर्ली परिसरातील सब वेचे रूंदीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच ठाकुर कॉम्प्लेक्स परिसरात उभारण्यात येणार्‍या जॉगर्स पार्कसाठी पालिकेची मंजुरी मिळाली असून यासाठी २ कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@