सोनमचे लग्न झाल्यावर आता करीना कोणाच्या समारंभात नाचत आहे?
महा एमटीबी   10-May-2018
 
 
 
 
 
अभिनेत्री सोनम कपूर ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सोनमच्या लग्नात दमदार मज्जा केल्यावर आता अभिनेत्री करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलानिया कोणत्या समारंभात नाचत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. मात्र आता या चौघीजणी ‘विरे दी वेडिंग’ हा त्यांचा आगामी चित्रपट यातील गाण्यात नाचतांना दिसत आहेत. 
 
 
 
 
 
या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या गाण्यात करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलानिया जोरदार नाचतांना दिसले आहेत. ‘भांगड़ा ता सजदा’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात चौघीजणी खूपच सुंदर दिसत आहेत. सध्या या चौघींचा हा आगामी चित्रपट असून या चित्रपटाची खूपच चर्चा सुरु आहे. 
 
 
या चारही मैत्रिणींनी मिळून या चित्रपटात काय धम्मा केली आहे हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यामुळे हे गाणे पाहून तरी तुमची उत्सुकता अजून वाढली नाही तर नवलच..