सोनम नंतर आता "ही"चा नंबर
महा एमटीबी   10-May-2018
 
 
मुंबई :  गेल्या २ - ३ दिवसांमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक ट्विटर यावर केवळ अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न आणि त्याचे फोटो व्हिडियोज हेच बघायला मिळत आहे. यामध्ये आज अचानक सकाळी अभिनेत्री नेहा धूपिया हिने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केल्याने खळबळ माजली. "माझ्या आयुष्यातील सगळ्यात योग्य निर्णय. आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राशी लग्न करणे." असे म्हणत तिने तिचा आणि एमटीव्ही व्हीजे आणि अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. 
 
 
 
 
या बाबत मात्र सिनेसृष्टीत कदाचित कुणाला कल्पना नव्हती आणि सोनमच्या लग्नात सर्व व्यस्त असताना अचानक ही बातमी आल्याने सगळ्यांचेच कान टवकारले आहेत, असे दिसून येत आहे. दिग्दर्शक करण जौहर याने आपल्या इंस्टाग्रामवर अंगद आणि नेहाचा फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. "अरे हे कधी झाले?" अशी प्रतिक्रिया तिने या फोटोवर व्यक्त केली आहे.
 
 
 
अनुष्का शर्मा नंतर आता नेहा धूपिया गुलाबी परिधान करत अत्यंत सुंद दिसत आहे, तर अंगद बेदी देखील तिला साजेसा दिसत आहे. ही बातमी आल्यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षावर झाला आहे. एकूणच सध्या बॉलिवुडमध्ये 'लग्न सीझन' आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.