अनुष्का लग्नानंतरचा पहिला वाढदिवस कसा साजरा करतेय पहा...
महा एमटीबी   01-May-2018
 
 
 
 
 
 
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे नुकतेच लग्न झाले आणि लग्न झाल्यावर आज तिचा पहिला वाढदिवस आहे जो ती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तिचा पती विराट कोहली सोबत साजरा करीत आहे. मात्र आजचा वाढदिवस ती विराटसोबत साजरा करीत असली तरी देखील यातून तिने तिचे सामाजिक भान चांगलेच जपले आहे. 
 
 
 
 
 
आपल्या इस्टाग्रामवरून तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, लवकरच मुंबईच्या बाहेर ती प्राण्यांसाठी घर तयार करणार आहे. आपण एक माणूस म्हणून जन्म घेतला आहे, आपण बोलू शकतो आपण आपला हक्क तोंडाने मागू शकतो मग आपली सामाजिक जबाबदारी विसरून कसं चालेलं. आपण मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे. त्यांच्या हक्कांचा आपण विचार करायला हवा असे या पोस्टमध्ये अनुष्काने म्हटले आहे. 
 
 
 
 
समाज त्यांच्या सोबत आज चांगल्या प्रकारे वागतो काय याचा विचार तुम्ही करा. आपण समाजशील प्राणी आहोत त्यामुळे समाजात जे घटक आढळतात त्यांची काळजी घेणं हे आपले कर्तव्य आहे. ते तर प्राणी आहेत. त्यांची काळजी घेणे हे तर आपले पहिले कर्तव्य आहे असे या पोस्टमध्ये अनुष्काने म्हटले आहे. त्यामुळे ती लवकरच प्राण्यांच्या निवारा बांधणार आहे.