ओळखा पाहू, कोण आहेत 'या' दोन अभिनेत्री...
महा एमटीबी   09-Apr-2018
 
 
 
 
‘ती अँड ती’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' आणि 'रमा माधव' या दोन चित्रपटानंतर मृणाल कुलकर्णी ‘ती अँड ती’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिसऱ्यांदा दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर येणार आहे.
या पोस्टरमध्ये ज्या दोन अभिनेत्री दाखवल्या आहेत हे ओळखणे तुम्हाला जरासे कठीण जाईल. कारण या दोन्ही अभिनेत्रींच्या लुकमध्ये काहीसा बदल करण्यात आला असून यांना ओळखणे जरा कठीण झाले आहे. मृणालने हे पोस्टर फेसबुकवरून शेअर केले आहे. 
 
 
                                  
 
 
या पोस्टरमधील पहिली अभिनेत्री ही सोनाली कुलकर्णी असून दुसरी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आहे तर या पोस्टरमध्ये दाखविलेला अभिनेता पुष्कर जोग हा आहे. मैत्रीवर आधारित हा चित्रपट असणार असून काही ‘ती आणि केवळ ती’ अशा विषयावर हा चित्रपट आधारित असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मृणालचा मुलगा विराजस याने लिहिली आहे त्यामुळे आई-मुलाने एकत्रित तयार केलेला हा चित्रपट कसा असेल याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे.