भारताला नेमबाजीत सुवर्ण पदक तर वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

पदक तालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर....  

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०१८ च्या पदक तालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर ३१ सुवर्णपदकांसह ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या क्रमांकावर १९ सुवर्णपदकांसह इंग्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर ८ सुवर्णपदकांसह भारत विराजमान आहे. भारताला या स्पर्धेत सध्या ८ सुवर्ण, ३ रजत आणि ४ कांस्य पदक मिळाले आहेत सध्या पदकांची एकूण संख्या १५ झाली आहे 
@@AUTHORINFO_V1@@