चिंता भविष्याची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018   
Total Views |

 

सीरिया एक छोटासा देश. दक्षिण-पश्चिम आशिया खंडाचा एक भाग, एका बाजूला समुद्र तर बाकीच्या बाजूंनी रशिया, इस्रायल, जॉर्डन, इराक, तुर्की यांनी वेढलेला. म्हणजेच चहूबाजूंनी खदखदणार्‍या भूभागांमध्ये वेढलेला हा देश आहे. पण, याच सीरियात सध्या सुरू असलेल्या घडामोडी जगाला भविष्याची चिंता करायला लावतील अशा आहेत. नुकतेच सीरियाच्या पूर्व भागातील घौटा येथे कथित रासायनिक हल्ल्यामध्ये ८० हून अधिक जण ठार झाल्यानंतर बंडखोरांवर हवाई हल्ले करण्यात आले. अमेरिकेने रासायनिक हल्ल्याचा निषेध केला. मात्र, रशिया आणि असाद सरकारने रासायनिक हल्ल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. सरकारी फौजा बंडखोर यांच्यात युद्धबंदी झाल्याचे, तसेच सीरियन सरकार आणि घौटातील शेवटचा बंडखोर गट असलेले जैश-अल-इस्लामयांच्यात बोलणी सुरू झाल्याचे वृत्त असतानाच हल्ले झालेले आहेत. या हल्ल्यात क्लोरीन गॅसचा वापर करण्यात आल्याच्या आरोपांमुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी संयुक्त राष्ट्रानेदेखील चिंता व्यक्त केली आहे. याआधी दि. एप्रिल २०१७ रोजी सीरियातील असाद सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध रासायनिक वायूचा उपयोग केला त्यात सुमारे ८६ मृत्युमुखी ५४६ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. लगेचच जगाच्या शांततेच्या ठेकेदाराने अर्थात अमेरिकेने सीरियाच्या त्या हवाई तळावर क्षेपणास्त्र सोडले. जेथून संभवतः ते रासायनिक हल्ले झाले. हा हवाई तळ दुसरा ठेकेदार रशिया वापरत होता. या हल्ल्यातसेरेनया केमिकलचा वापर करण्यात आला होता. ‘सेरेनहे अत्यंत घातक रसायन आहे. सायनाईडपेक्षा २० पट अधिक विषारी असणारे हे रसायन आहे. ‘सेरेनथेट मज्जासंस्थेवर परिणाम करते. त्यातून हृदय आणि श्वसनसंस्थेतील स्नायू जखडले जातात. हे रसायन पुरेशा प्रमाणात संपर्कात आले तर काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धात ज्याप्रकारे अणुबॉम्बचा कहर सर्व जगाने अनुभवला, आणि त्यानंतर त्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले; त्याचप्रकारे भविष्यात हे रासायनिक हल्ले आणखी संहारक पद्धतीने जगभरात खळबळ माजवतील. त्यामुळे रासायनिक हल्ले, सीरियातील अशांतता आणि युद्धाचे बदलले स्वरूप यामुळे भविष्याची चिंता करणे गरजेचे आहे.

 

पिंजर्‍यातल्या वाघाची पोपटपंची

तर आम्ही राजीनामे देऊ, तर आम्ही सत्ता सोडू, तर आम्ही करून दाखवू, तर आम्ही...’’ची पोपटपंची कायम असल्याचे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यातून समोर आले. भाजपच्या महामेळाव्यात अमित शाह यांनी युतीचे संकेत देऊनही उद्धव ठाकरे यांनी तिरकस भूमिका कायम ठेवली. सेनेच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य मतदारही आता बुचकळ्यात पडू लागला आहे. एकीकडे सत्तेतही राहायचे, सत्तेची उबही घ्यायची आणि वेळ पडेल तिथे तीव्र विरोधही दर्शवायचा. लोकसभेतील सेनेचे सर्वाधिक खासदार हे केवळ भाजपच्या विश्वासार्हतेमुळेच आले, हे वास्तव नाकारून सेना सातत्याने स्वबळाच्या बाता मारते ती कोणाच्या जीवावर? हा प्रश्नच आहे. याआधी विधानसभेतबाळहट्टामुळे धरलेला १५० जागांचा आग्रह असो किंवा मग पालिका निवडणुकीत सेनेने आधीपासूनच युती करण्याचा घेतलेला निर्णय असो, सेनेने कायमच आडमुठेपणाची भूमिका घेत केवळ सत्तेच्या लोभापायी लज्जास्पद राजकारणाचा तळ गाठला. ‘करून दाखवलेम्हणताना सेनेच्या खासदारांच्या खिशातील राजीनामे मात्र काही बाहेर पडले नाहीत, ना त्यांनी तेलुगू देसम पक्षासारखी कठोर भूमिका घेत सत्ता सोडली. त्यामुळे वाघाची प्रत्येक गर्जना ही पोकळ होती, हे स्पष्ट होते. राष्ट्रीय स्तरावर राजकारण करण्याच्या मनोवृत्तीने आणि भाजपला राज्यासह बाहेरही आपली ताकद दाखविण्याच्या इराद्याने सेनेने उत्तर प्रदेश, गोवा यांसारख्या राज्यात आपले उमेदवार उभे केले. परंतु, त्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. स्थानिक पातळीपासून ते आता राष्ट्रीय पातळीपर्यंत खांद्याला खांदा लावण्याचा जो काही प्रयत्न सेना करत आहे, त्याबाबत त्यांच्या सातत्याने बदलत जाणार्‍या भूमिकेमुळे प्रश्नच उपस्थित होतो. भाजपचे खदखदणारे वर्चस्व आणि जनमानसात भाजपविषयी वाढत जाणारा विश्वास यामुळे उद्धव ठाकरे हे खरेतर धास्तावले आहेत. २०१९ चे चित्र वेगळे असेल, असे त्यांना वाटत असले तरी त्या चित्रात ते स्वतः असतीलच याची खात्री नसल्याने पिंजर्यातील वाघ गुरगुरत आहे. हे एवढ्यावरच थांबले असते तर ठीक, पण भाजपला शह देण्याच्या मनोवृत्तीने आता कर्नाटकातही सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. त्यामुळे पिंजर्‍यातील वाघाची ही पोपटपंची कितपत मनावर घ्यायची, हे ज्याने त्याने ठरवावे.

 
@@AUTHORINFO_V1@@