बाप रे! असेही नाचू शकतात महेश मांजरेकर...
महा एमटीबी   09-Apr-2018
 
 
 
 
 
 
मराठी चित्रपटात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी दिग्दर्शक व मराठीतील नावाजलेले अभिनेते महेश मांजरेकर हे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी मराठीतील बिग-बॉस यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. आज या मराठी बिग-बॉसचं टायटल साँग अर्थात (शीर्षक गाणे) प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यातील महेश मांजरेकर यांचा अंदाज तुम्ही पाहिलात तर चकित झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
 
‘घेवू नका पंगा’... असे या गाण्यात महेश मांजरेकर म्हणतांना दिसत आहेत. त्यांच्या नृत्याविष्काराने तर प्रेक्षकांचे डोळे उघडे राहिले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. हिंदीमधील बिग-बॉसने प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले. याच पार्श्वभूमीवर आता मराठी बिग-बॉस सुरु करण्यात आले असून या कार्यक्रमाचे ‘होस्टिंग’ महेश मांजरेकर करणार आहेत. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे गायक अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. 
 
 
 
गेल्या कित्येक दिवसांपासून मराठी प्रेक्षकांना मराठी बिग-बॉसची उत्सुकता लागली होती. शेवटी आता मात्र या कार्यक्रमाचे ‘टायटल साँग’ प्रदर्शित करण्यात आले असून सध्या सोशल मीडियावर हे गाणे खूपच व्हायरल केले जात आहे. तुम्ही देखील एकदा नक्की पहा हे गाणे...