अरे हे २.५ महीन्यांचे बाळ की जलपरी ?
महा एमटीबी   09-Apr-2018

 
 
मुंबई :  २ - २.३० महीन्यांचे बाळ पोहू शकते का? असा प्रश्न आपल्यास कुणी विचारला तर आपण त्याला काय उत्तर द्याल? नाही. कदाचित हेच उत्तर असणार. मात्र अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कन्येला म्हणजेच "जिजा" हिला पोहताना बघून आपण आपलं उत्तर नक्की बदलाल. उर्मिला हिने "जिजा"चा पोहतानाचा एक व्हिडियो पोस्ट केला आहे.
 
या व्हिडियोमध्ये तिच्या मुलीचा आवाज अत्यंत गोड आलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी या व्हिडियोला छान प्रतिसाद दिला आहे. तिच्या या व्हिडियोला जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
 
 
 
 
 
या व्हिडियोला पोस्ट करताना तिने लिहिले आहे की, "बेबी कॅसलला धन्यवाद. बेबी कॅसल येथे वयवर्षे ०-३ या वयोगटातील लहान मुलांसाठी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर पोहोण्याचा तलाव आहे. छोटी बाळं ही जन्मजात पोहण्यात पारंगत असतात, कारण आईच्या गर्भात ते पोहतच असतात. लहानपणापासून पोहण्याची कला त्यांना अवगत करुन दिली की ते स्नायूंचा आणि उजव्या आणि डाव्या मेंदूचा उत्तम विकास होतो सर्व नवीन पालकांनी एकदा हे नक्की करुन बघा." असे म्हणत तिने नवीन पालकांना सल्ला देखील दिला आहे.
 
पोहणारं हे बाळ खूपच गोड आहे. आणि त्यामुळे चाहत्यांचा या व्हिडियोला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.