या "सोनिया गांधी" नाहीत.. तर मग कोण?
महा एमटीबी   08-Apr-2018
 
 
जर्मनी येथील अभिनेत्री सुझान बर्नेट सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. "द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर" या आगामी चित्रपटातून ती "सोनिया गांधी" यांची भूमिका साकारणार आहे. तिचा हा फोटो बघून कुणीची एका क्षणासाठी तिला सोनिया गांधी समजू शकतो.
 
सुझान बर्नेर्ट ही सध्या भारतातच राहत असून तिने अनेक छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये आता पर्यंत सहभाग नोंदवला आहे. ई टीव्ही मराठीवर गाजलेल्या 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमात या जर्मन अभिनेत्रीने मराठमोळ्या लावणीवर नृत्य देखील केले आहे.
 
 

 
 
 
सुझान बर्नेर्टने यापूर्वी 'प्रधानमंत्री' या टीव्ही मालिकेमध्ये सोनिया गांधींची भूमिका साकारली होती. संजय बारुआ यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटात अनुपम खेर हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.