आणि सलमानच्या चाहत्यांना आनंद झाला...
महा एमटीबी   07-Apr-2018
 
 

 
 
 
काळवीट शिकार प्रकरणी दोषी आढळलेल्या सलमान खानला आज जोधपूर न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मिडीयावर या सगळ्या आनंदाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. I love Salman Khan, We Miss U Sallu, आमच्या प्रार्थना सिद्ध झाल्या आहेत अशा प्रकारचे वाक्य त्याचे चाहते सोशल मिडीयावर टाकत आहेत.
 
 
तसेच सलमान खान याला जामीन मंजूर होताच ट्वीटरवर WE LOVE SALMAN KHAN असा ट्रेंड देखील सुरु झाला आहे. बॉलीवूडमधून देखील मिश्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळत आहेत. दोन दिवस कारागृहात राहिल्यानंतर आज सलमान खान याला जामीन मंजूर झाला असल्याने आता त्याचा पुढचा काहीसा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.
 
सोशल मिडियावरील प्रतिक्रिया :