सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढला
महा एमटीबी   06-Apr-2018

जामीन अर्जावर सुनावणी उद्या

 
 
जोधपुर : काळविट शिकार प्रकरणी ५ वर्षाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. जोधपुर न्यायालयात जमीनसाठी अर्ज केल्यानंतर त्यावर उद्या सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. त्यामुळे आजची रात्र देखील सलमान खान याला तुरुंगातच काढावी लागणार आहे.
 
 
१९९८ साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी मध्यरात्री केलेल्या काळविट शिकार प्रकरणात सलमान खान दोषी आढळला. जोधपुर न्यायालयाने त्याला ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सलमानला त्वरित जेलमध्ये हलविण्यात आले.
 
 
अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापू देखील त्याच तुरुंगात आहे. सलमान खानला व्ही. आय. पी. बराक देण्यात आला होता. त्याचबरोबर आसाराम बापू यांच्या बराकमध्ये राहण्यास सलमानने नकार दिल्याचे वृत्त देखील बाहेर आले आहे. एक दिवसाच्या तुरुंगवासानंतर त्याच्या वकिलाने जमिनीसाठी अर्ज केला, मात्र सलमानचा गुन्हेगारी इतिहास बघता त्यावर निर्णय देण्यास न्यायालयाने अजून एका दिवसाचा वेळ घेतला आहे. त्यामुळेच सलमानच्या मुक्कामात वाढ झाली आहे.