नागराज मंजुळे यांनी हटके अंदाजात केले मराठी माध्यमाचे प्रमोशन
महा एमटीबी   06-Apr-2018
 
 
 
 
 
 
 
सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या स्वत:च्या फेसबुक संकेतस्थळावरून मराठी भाषेप्रती त्यांचे प्रेम आणि मराठी माध्यमातील शिक्षणाचे जरा हटकेच प्रमोशन केले आहे. नागराज मंजुळे यांनी नुकतेच आपले फेसबुक प्रोफाईल छायाचित्र बदलविले असून मंजुळे यांनी विचार करायला भाग पाडणारी पोस्ट शेअर केली आहे.
 
 
 
करमळ्यातील त्यांच्या जुन्या मराठी माध्यमातील शाळेचे छायाचित्र त्यांनी फेसबुक प्रोफाईल म्हणून टाकले असून या शाळेसारखी आता मराठी भाषेची अवस्था झाली आहे असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे ते म्हणतात, भाषा हे ज्ञानप्राप्तीचं माध्यम आहे, मात्र आजचे पालक इंग्रजीला महत्व देवून आपल्या मराठी भाषेचे महत्व कमी करत आहेत.
 
 
 
 
                               
 
 
 
मुळातच आपल्यामध्ये कला आणि ज्ञानप्राप्तीची उमेद असेल तर मराठी भाषेतून देखील प्रगती होवू शकते याचे कित्येक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले असून मराठी भाषेतून देखील आपण ज्ञान प्राप्त करू शकतो फक्त आपल्या मनातील भाषेप्रती असणारे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
आज असे कित्येक पालक आहेत जे आपल्या पाल्यांना मराठी भाषेतून शिक्षण देण्यास कचरतात मात्र शिक्षण कुठल्याही भाषेत असो ते समजणे आणि त्याचा वापर योग्य ठिकाणी होणे गरजेचे आहे. असे काहीसे आपल्या पोस्टमधून नागराज मंजुळे आपल्या मराठी पालकांना सांगू इच्छित आहेत असे दिसून येते.