हे माजी पंतप्रधान सिंग नाहीत, हे तर अभिनेते अनुपम खेर!
महा एमटीबी   05-Apr-2018


 
 
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर भाष्य करणाऱ्या 'दि ऍक्सिडेंटल प्राईममिनिस्टर' या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरु झाले. या चित्रपटात डॉ. सिंग यांची व्यक्तिरेखा अनुपम खेर साकारत असल्याचे याआधीच सर्वश्रुत आहे. पण आज स्वतः खेर यांनी या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखेचा पहिला लुक सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. 'दि ऍक्सिडेंटल प्राईममिनिस्टर' या संजय बारू यांच्या वादग्रस्त पुस्तकावरच हा चित्रपट आधारित आहे.
 
 
विजय रत्नाकर गुट्टे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हंसल मेहता चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. यामध्ये संजय बारू यांची भूमिका अक्षय खन्ना साकारणार आहे. अनुपम खेर यांचा मेकअप अशा बखुबीनें केला आहे की क्षणभर एखाद्याला खेर डॉ. सिंगच वाटू शकतील. पहिल्या लुक पासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे, हे मात्र खरं.