"धडक" मध्येही "झिंगाट"चा फिव्हर
महा एमटीबी   05-Apr-2018

मुंबई : सैराटमधील झिंगाट आणि याड लागलं ह्या दोन गाण्यांनी मराठीसह बॉलिवूडलाही भूरळ पाडली होती. त्यामुळेच सैराटच्या रीमेकमध्येही ही गाणी असणार असल्याची माहिती धडकचे संगीतकार अजय अतुल यांनी दिली आहे. भारतीय डिजीटल पार्टीच्या कास्टिंग काऊच या वेब सिरीजमध्ये त्यांनी ही माहिती दिली. पण याबाबत आणखी माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
सैराट या नागराज मंजूळे दिग्दर्शित मराठी चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमा केला होता. १०० कोटी कमावणारा हा मराठीतला पहिला चित्रपट ठरला. सैराटचा रिमेक हिंदीत होत असून आर्चीच्या भुमिकेत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी तर परशाच्या भुमिकेत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांना कास्ट करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या सेटवरचे फोटो बऱ्याचदा व्हायरलही झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान करत असून हा चित्रपटा ८ जुलै रोजी प्रदर्शित होईल.

१० शुन्य टाकले तरी शक्य नाही


कास्टिंग काऊचमध्ये निपुणच्या आगामी चित्रपटाला संगीत देण्यासाठी अजय अतुल यांना विचारणा केली असता, अजय अतुल यांनी करारावर दिलेल्या संख्येवर २ शुन्य वाढवले. हे मानधन जास्त असल्याने अमेयने तुम्हा दोघांपैकी एकाचे संगीत द्या असे सुचवले. तेव्हा अतुल म्हणाले की, यावर १० शुन्य टाकले तरी हे शक्य नसल्याचे सांगितले. अर्थात निपुण आणि अमेयने हे जरी मस्करी विचारले तरी अतुल यांच्या उत्तरावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


नागराज मंजूळे रीमेक पासून दूर ?


सैराट चित्रपटातील परशा हा गरीब कुटुंबातला असतो पण हिंदी रीमेकमध्ये परश्याची भुमिका बजावणारा नायक हा श्रीमंत घरातला दाखवला आहे. तसेच चित्रपटाच्या पटकथेमध्ये अनेक बदल केल्याने नागराज नाराज असल्याचेही सांगण्यात येत आहे.