काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान याला ५ वर्षांची शिक्षा
महा एमटीबी   05-Apr-2018
 
 
 
१९९८ साली हम साथ-साथ है या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान केलेल्या काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खान दोषी ठरला आहे. जोधपुर न्यायालयाने यावर आज सुनावणी केली असून सलमान खान याला पाच वर्षांची कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे सलमान खान याला न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे.  त्याचबरोबर या प्रकरणात अडकलेला अभिनेता सैफअली खान, अभिनेत्री तब्बू आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना न्यायालयाने दोषमुक्त ठरवलेले आहे.
 
 
 
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सलमान खान रेस ३ या चित्रपटाची शुटींग सोडून बुधवारी अबुधाबी येथून मुंबईत दाखल झाला होता. आज सकाळी सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू देखील जोधपुर येथे दाखल झाले. १ ऑक्टोबर १९९८ साली मध्यरात्री एका काळविटाची शिकार सलमान खान याने केली होती. घटनास्थळी सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू देखील उपस्थित होते.