अनुपम खेर यांना बाफ्टासाठी मिळाले नामांकन
महा एमटीबी   05-Apr-2018
लंडन : प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर यांना ब्रिटेनमधील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या 'बाफ्टा' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. बाफ्टातर्फे देण्यात येणाऱ्या 'सर्वोत्कृष्ट सहाय्य अभिनेता' या श्रेणीसाठी त्यांना हे नामांकन देण्यात आले आहे. खेर यांना हे नामांकन प्राप्त झाल्यापासून देशातील विविध स्तरातून सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.

ब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म आणि टेलीव्हिजन आर्ट अर्थात बाफ्टाकडून नुकतीच बाफ्टा पुरस्कार आणि त्यातील नामांकनाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेर यांच्या 'द बॉय व्हीथ द टॉपनॉटस्' या चित्रपटाला देखील नामांकन मिळाले आहे. यामध्ये खेर यांनी केलेल्या अभिनयासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्या'च्या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
'द बॉय व्हीथ द टॉपनॉटस्' हा चित्रपट एका ब्रिटीश पत्रकाराच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची कथा एका पंजाबी कुटुंबाभोवती फिरताना दाखवली आहे. यामध्ये खेर यांनी चित्रपटाचा नायक 'सतनाम' याच्या पित्याची भूमिका साकारलेली आहे. ब्रिटेनमधील बीबीसी आणि क्यूडॉस फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन या कंपन्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.