जीएसटी आणि नोटाबंदीचा 'इम्पॅक्ट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

प्रत्यक्ष करामध्ये १८ टक्क्यांची भरघोस वाढ





नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करांच्या अंमलबजावणीचा परिणाम आता भारतीय महसूल खात्यावर होत असल्याचे दिसत आहे. नोटाबंदीनंतर देशात जीएसटी लागू केल्यानंतर एका वर्षात सरकारकडे जमा होणाऱ्या प्रत्यक्ष करामध्ये तब्बल १८ टक्क्यांची भरघोस वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच यंदा करदात्यांमध्ये देखील विक्रमी वाढ झाली असल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः देखील याविषयी माहिती दिली आहे. २०१७-१८ च्या आर्थिक वर्षामध्ये केंद्रकडे तब्बल १० लाख २ हजार ६०७ कोटी रुपये इतका प्रत्यक्ष कर जमा झाला आहे, असे जेटली यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष करामध्ये झालेली ही सर्वात मोठी असून कर जमा होण्याचे हे प्रमाण तब्बल १८ टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या सरकारने देशाच्या आर्थिक हितांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. त्यामुळेच आज देशातील करदात्यांची संख्या देखील वाढ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याच बरोबर जीएसटीचा देखील अत्यंत सकारत्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवर आणि आयटी रिटर्न्स भरणाऱ्यांवर झाला असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभरात आयटी रिटर्न्समध्ये १ कोटीहून अधिकची वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात देशात ५.४३ कोटी इतका आयटी रिटर्न्स जमा झाला होता, परंतु जीएसटी लागू केल्यानंतर यंदा तो ६.८४ कोटींवर जाऊन पोहचला असल्याचे त्यांनी जेटलींनी सांगितले आहे.


@@AUTHORINFO_V1@@