बॉलीवूडकरांना देखील 'फर्जंद'ची भुरळ पडली
महा एमटीबी   04-Apr-2018
 
 
 
 
 
 
रयतेचा राजा शिवाजी महाराजांचे हात असणारे मावळे यांच्यावर येणारा दिग्दर्शक दिगपाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट ‘फर्जंद’ याची भुरळ सध्या बॉलीवूडवर देखील पाहायला मिळत आहे. आता नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेत्री रविना टंडन आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श या दोघांनी हे पोस्टर सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
 
 
 
 
या चित्रपटाचे विशेषण असे की हा चित्रपट ‘AA films’ प्रस्तुत असून ‘बाहुबली’ हा चित्रपट देखील देखील ‘AA films’ प्रस्तुत होता. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अंकित मोहन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. १ जून २०१८ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे टीझर देखील प्रदर्शित झाले होते. या टीझरला देखील मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आपण फकस्त लडायचं...आपल्या राजांसाठी आन स्वराज्यासाठी...! अशी या चित्रपटाची ‘टॅग लाईन’ आहे.