स्वतः मधील बुद्धाला ओळखा : पंतप्रधान मोदी
महा एमटीबी   30-Apr-2018

बुद्ध जयंतीनिमित्त नवी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नवी दिल्ली : 'वयक्तिक आणि सामाजिक जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी व्यक्तीने प्रथम स्वतःमधील बुद्धाला ओळखले पाहिजे.' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. नवी दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडून बौद्ध जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.'तथागत बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करून नागरिकांनी प्रथम आपल्या आतमध्ये सुरु असलेले युद्ध जिंकले पाहिजे. व्यक्ती ज्यावेळी स्वतःमधील बुद्धाला ओळखेल त्यावेळी त्याला आपल्या जीवनातील आणि समाजाच्या जीवनातील प्रत्येक संकटावर मार्ग काढता येईल, त्यामुळे बुद्धांच्या शिकवणींचे प्रत्यक्ष आचरण करणे' गरजेचे आहे' असे त्यांनी यावेळी म्हटले.


'समरसतेचे आचरण' हाच बुद्धला जाण्याचा मार्ग

'तथागत गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये समता, समरसता, समदृष्टी आणि संघभाव या आदर्शपना केली. मुल्यांची स्थासर्व मानवाजातीला एकत्र करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या आदर्श शिकवणुकीमुळेच आज जगाने त्यांना महापुरुषाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे तथागत बुद्धांना खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या समता आणि समरसता या शिकवणींचे प्रत्यक्षात आचरण केले पाहिजे' असे त्यांनी यावेळी म्हटले. .


भारताच्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून गेल्या काही तीन वर्षांपासून सातत्यने बौद्ध जयंतीनिमित्त नवी दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उत्सवात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा देखील या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. तसेच भारत, जपान, श्रीलंका आणि व्हियेतनाम येथिल काही बौद्ध धर्मगुरूंचा सत्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आला.