फाफे नंतर आता "माऊली" जिंकणार प्रेक्षकांचे मन
महा एमटीबी   30-Apr-2018

 
 
मुंबई :  फास्टर फेणेच्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे "माऊली." फाफेनंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित माऊली लवकरच चाहत्यांसाठी सिनेमागृहांमध्ये येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणार आहे.
 
 
 
 
काही दिवसांआधी आलेल्या 'फाफे' म्हणजेच फास्टर फेणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली होती. या चित्रपटाचे प्रायोजक रितेश देशमुख होते. आता माऊली या चित्रपटातून रितेश मुख्यभूमिकेत दिसणार आहे. फाफे चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आदित्य सरपोतदारची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आली होती.
 
 
 
 
 
या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आपल्याला पुन्हा एकदा मराठमोळ्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी "लय भारी" या मराठी चित्रपटात रितेशने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर आला दुसऱ्यांदा "माऊली"च्या माध्यमातून तो मराठी चाहत्यांना भेटायला येणार आहे. गम्मत म्हणजे लय भारी चित्रपटात देखील रितेशच्या भूमिकेचे नाव "माऊली"च होते. त्यामुळे या चित्रपटात रितेशची काय भूमिका असणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे.