द ऑल न्यू जीमेल
महा एमटीबी   28-Apr-2018
 
 
 
 
 
 
‘जीमेल’ ही सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरली गुगलची ई-मेल सेवा. बदलती वेळ आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे गुगलने गेल्या काही काळात अनेक बदल केले आहेत. वापरकर्त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे बदल करून, ते अधिक सुलभ करण्यावर भर देत, आता ‘जीमेल’मध्येही काही नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिक युझर फ्रेंडली ‘जीमेल’ अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने युझर्सच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. गुगलमध्ये काय बदल झाले आहेत हे आपण पाहूयात.
 
 
 
सर्वप्रथम’जीमेल’ अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये जाऊन, ’ट्राय न्यू जीमेल’ या ऑप्शनवर क्लिक केल्यास, आपल्याला ’जीमेल’चे नवे रूप पाहता येणार आहे. ’जीमेल’मध्ये कोणत्याही ई-मेलवर कर्सर आणल्यास मार्क रेड, आर्काइव्ह, डिलिट आणि ‘सून्झ’ हे ऑप्शन्स पाहायला मिळतात. त्यामध्ये ‘सून्झ’ हा नव्याने देण्यात आलेला पर्याय आहे. एखादा विशिष्ट मेल विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी पाहायचा असेल, तर ती वेळ आणि तारीख याद्वारे आपल्याला सेट करून ठेवता येऊ शकते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट वेळेलाच तो मेल आपल्या ई-मेलच्या इनबॉक्समध्ये दिसणार आहे. यापूर्वी केवळ पाठवण्यात येणार्‍या ई-मेलसाठी उपलब्ध होती. मात्र, यापूर्वी हा ऑप्शन केवळ मेल पाठवण्यासाठी देण्यात आला होता.
 
 
 
तर नव्या ’जीमेल’मधील आणखी एक फीचर म्हणजे ’जीमेल’च्या इनबॉक्समध्ये कीप, टास्क आणि गुगल कॅलेंडरसारखे काही ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या ऑप्शन्सचा वापर करून आलेल्या ई-मेल्सनुसार आपल्याला कामाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. एखादी विशिष्ट नोंद करण्यासाठी ‘कीप’चा तर आठवड्याभरातील किंवा दिवसभरातील करायच्या कामांची यादी ‘टास्क’ या ऑप्शनच्या माध्यमातून करता येणार आहे.
 
 
 
नव्या अपडेटमध्ये हाय प्रोफाईल नोटिफिकेशनचे फीचर देण्यात आले आहे. याचाच वापर करून, नोटिफिकेशनचा फिल्टर सेट करता येणार आहे. या फीचरमुळे आपल्याला येणार्‍या महत्त्वाच्याच मेलचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्याला सततचे येणारे नोटिफिकेशन्स ९७ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचा दावा गुगलने केला आहे, तर आणखी एक नवे फीचर म्हटले, तर यात डिफॉल्ट, कॉम्पॅक्ट आणि कम्फर्टेबल असे नवे तीन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. याचा वापर करून, आपल्याला आलेल्या मेलमध्ये कोणती अटॅचमेंट आहे किंवा नाही हे आपल्याला मेल न उघडताच पाहता येणार आहे, तर ‘कम्फर्टेबल’ या ऑप्शनचा वापर केल्यास, पूर्वी वापरत असलेल्या जीमेलनुसारच अटॅचमेंट पाहता येणार आहेत. अनेकदा आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते किंवा इंटरनेटचा स्पीड कमी असतो. त्यामुळे ’जीमेल’ वापरण्यात अडथळे येत असतात. अगदी ही बाब हेरत ’जीमेल’चे नवे ऑफलाईन व्हर्जनदेखील उपलब्ध होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना, ऑफलाईन पद्धतीने ’जीमेल’च्या सेवेचा वापर करता येणार आहे. यापूर्वीही या सेवेचा लाभ मिळत असला, तरी आता या सेवेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मेल सिंक करण्यात येणार असून, इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर तो मेल अपलोड होणार आहे. आपण कामात व्यस्त असताना अनेकदा वेळेअभावी रिप्लाय देत नाही. यावरही गुगलने एक नवा पर्याय शोधून काढला आहे. ’ओके, थँक यू!’ अशा शब्दांचे पर्याय गुगलने दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक शब्द टाईप करत बसण्याची गरज नाही. कामात व्यस्त असतानाही गुगलने दिलेल्या पर्यायांचा वापर करून रिप्लाय देणे शक्य होणार आहे, तर आपल्या कम्प्युटर, लॅपटॉपवर ’जीमेल’ वापरताना आपल्याला नवनव्या थीम्सचा पर्याय देण्यात येणार आहे, तर आपल्या ’जीमेल’च्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्येही काही बदल करण्यात आले आहे. याद्वारे आपल्या जीमेलमध्ये आपण सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट्‌स हे आपल्याला एखाद्या व्हिजिटींग कार्डप्रमाणे दिसणार आहेत. काळाप्रमाणे बदल करण्याची गुगलची परंपराच राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही नवे फीचर्स अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.  
 
 
-जयदीप दाभोळकर