रेडू म्हणजे काय माहित आहे काय? नाही माहित तर ट्रेलर पहा...
महा एमटीबी   27-Apr-2018
 
 

 
 
 
रेडू म्हणजे काय? असेल एखाद्या प्राण्याचं नाव असचं तुम्हाला देखील वाटलं असेल मात्र रेडू म्हणजे रेडीओ असा याचा अर्थ आहे. रेडू नावाचा नवीन मराठी चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मनोरंजक आणि हसविणारा हा ट्रेलर असून रेडीओचे वेड एखाद्या माणसाला लागले की तो खाता-पिता-उठता-बसता कसा रेडीओ घेवून फिरतो अशी काहीशी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 
 
 
 
 
                              
 
 
 
दिग्दर्शक सागर छाया वंजारी दिग्दर्शित रेडू हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या घरी असणारा रेडिओ अर्थात आता त्या रेडिओची जागा स्मार्ट फोनने घेतली असली तरी देखील ग्रामीण भागात अजून देखील रेडिओचे आकर्षण कमी झालेले नाही. अश्याच एका रेडिओ वेड्या माणसाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका शशांक शेंडे यांनी केली असून या चित्रपटात मालवणी भाषेचा विनोदी तडका टाकण्यात आला आहे. 
 
 
 
लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवल सारडा यांच्या सौजन्याने ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.