‘राझी’चे पहिले गाणे पाहिले काय? तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल..
महा एमटीबी   26-Apr-2018
 
 
 
 
 
 
‘राझी’ या चित्रपटाचे आज पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेत्री आलिया भट्ट अतिशय सुंदर दाखवण्यात आली आहे. मात्र हे गाणे पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी आल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाल्यावर आपल्या वडिलांचे घर सोडतांना आपल्या मनात काय प्रश्न असतात आणि लग्न करून जर आपल्या देशाची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये जायचे असेल तर काय परिस्थिती असते याचे सुंदर चित्रण या गाण्यात दाखवण्यात आले आहे. 
 
 
 
 
राझीचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. यात आलियाची जोरदार प्रशंसा झाली. आता या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘दिलबरो’ असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या ट्वीटरवर या गाण्याचा ट्रेंड सुरु आहे. एक सामन्य घरची मुलगी देशासाठी हेरगिरी करणारी गुप्तचर अधिकारी म्हणून आलिया हिला या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शक कारण जोहर याने हे गाणे ट्वीटरवर शेअर केले आहे. 
 
 
 
 
देशाची गुप्तहेर म्हणून जाण्यासाठी लागणारी मानसिक आणि शारिरीक तयारी, लग्न करून जात असल्यामुळे त्यामुळे निर्माण होणारी नवीन नाती त्यातली गुंतवणूक आणि शेवटी आपण फक्त देशासाठीच आहोत स्वत: च्याही आधी ही जाणिव अश्या अत्यंत कठीण व्यक्तिरेखा या चित्रपटात आलिया हिने पार पाडल्या आहेत. तुम्ही देखील एकदा नक्की हे गाणे पहा...