या इंग्लिश सिरीज नक्की बघा...
महा एमटीबी   26-Apr-2018
आपल्या घराघरांत रोज आपण त्या विशेष मराठी मालिका आवडी किंवा नावडीनीसुध्दा पाहत असतो. तीच ती स्टोरी कलाकार मात्र वेगळे अश्या आशयांच्या या मालिका आपल्या फक्त भांडायचं कसं आणि फॅशन कशी असते (भडक तीही) हेच शिकवतात. असं मला वाटतं. मात्र आपण थोडं इंग्रजी भाषेतल्या सिरीज म्हणजे मालिका पाहिल्या तर त्यात तर्क, काल्पनिकता आणि टाईमलीनेस बघायला मिळतो. यामुळे त्या इंटरेस्टिंग तर होतातच आणि त्या सिझनमध्ये प्रदर्शित होत असल्यामुळे त्या बघण्यातला इंटरेस्ट वाढतोच. असं अजिबात म्हणणे नाही की, तिथल्या मालिका ह्या रटाळ नसतातच वगरे पण याच प्रमाण नक्कीच तुलनेने कमी आहे.

चला तर मग अश्याच काही इंटरेस्टिंग इंग्लिश सिरीजबद्द माहिती घेऊयात आणि वेळ काढून त्या पाहूयात सुध्दा.
 


 
१. फेंन्डस् – मोनिका, रेचेल, फिबी, ज्योइ, चॅंग्लर आणि रॉस नाव ऐकूनही आपण सेंट्रल पर्क कॅफेमध्ये बसलो आहोत असा वाटतं ना. हा शो जेव्हा पासून सुरू झाला तेव्हापासून तो आजतायगत हिटच आहे. कोणत्याही कॉलेजला जाणाऱ्या मुलाला विचारा ह्या शो बद्दल तो एक तरी त्याचा असा मित्र सांगेल जो या शोमधल्या कॅरेक्टरशी रिलेट करू शकेल. कारण इतकी आपल्यातली पात्र यात रंगवली आहेत. १९९४ ते २००४ अशी दहा वर्ष या सिरिज नी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवला आणि आजही गाजवत आहे. याचं थीम सॉंग तर तुफानच आहे. अमेरिका असो किंवा भारत प्रत्येकाच्याच मैत्रीला सुट होईल असं हे गाणं आहे.
या सिरीजचे एकूण १० सिझन आहेत.२. प्रिझन ब्रेक –
राजकारणामुळे तुरूंगात गेलेल्या भावाचे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी आणि त्याला सोडविण्यासाठी आखलेली व्यूहरचना अश्या धरतीवर ही सिरीज आहे. आणि या प्रवासात मिळालेले मित्र आणि शत्रू यांच्यावर मात करत तुरूंगातून सुटका करण्यासाठीचा प्रवास यात दाखवला आहे. २००६ ते २००९ आणि २०१७ या सिरीजचे एकूण पाच सिझन आत्तापर्यंत आलेले आहेत.३. गेम ऑफ थ्रोन्स –
जॉर्ज आर. आर मार्टिन या लेखकाच्या अ सॉंग ऑफ आइस अड फायर या काल्पनिक पुस्तकांवर आधारित ही सिरीज सध्या प्रचंड प्रमाणात हिट ठरली आहे. ७ किंग्डमस् आणि त्यातली यादवी या धरतिवर ही सिरीज आहे. जबरदस्त VFX अनिमेशन कास्टिंग असलेल्या ह्या सिरीजचा आठवा सिझन पुढच्या वर्षी येणार आहे. याचे एकूण ७ सिझन आहेत आणि ८ सिझनचे शूटींग सुरू आहे.
४. न्यूजरूम –
एका न्यूज चॅनेलच्या न्यूजरूम मध्ये असलेला गोंधळ आपल्याला माहिती असेल. अश्याच एका न्यूजरूम मध्ये अचानक संपूर्ण टीम बदलली जाते आणि एक न्यूज एंकर तिथे राहते आणि तो या नव्या टीमबरोबर काम करताना काय फेस करतो हे यात दाखवण्यात आलं आहे. २०१२ ते २०१४ या दिवसाच या सिरीजचे एकूण ३ सिझन आले आहेत.५. ऑरेंज इझ न्यू ब्लॅक –
यामधील मेन कॅरेक्टर असलेल्या मुलीला ड्रग डीलमध्ये पकडलं जातं आणि यासाठी तिला १५ महिन्यांसाठी तुरूंगात टाकल जाते. आणि तिथे घडणाऱ्या मजेशीर गोष्टी यात दाखविण्यात आल्या आहेत. या सिरीजचे १३ भागांचे ५ सिझन आत्तापर्यंत आले आहेत.६. बिग बॅंग थेअरी –
सायन्सवर आधारित ही सिरीजला मोठ्या प्रमाणवर प्रतिसाद मिळाला. मुख्यत्वे फिजिक्स विषयातले चार पदवीधर हे यातले मुख्य पात्र आहेत. त्यांच्या भोवती फिरणाऱ्या या सिरीजमध्ये अनेक शास्त्रज्ञांनी यात आपला गेस्ट अपियरन्स दिला आहे. ज्यात स्टिफन हॉकिंग यांचाही समावेस होतो.
७. होमलॅंड –
गिदोन राफ यांच्या प्रिझनर्स ऑफ वॉर या कादंबरीवर ही सिरीज बनविली आहे. सी. आय. ए एजंट आणि त्याच्या भोवती ही कथा फिरते. याचे एकूण सात सिझन आत्तापर्यंत आले आहेत.


 
८. हाऊस ऑफ कार्डस् – सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेल्या नायकाला स्वत: च वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यानी त्याला ज्या लोकांनी धोका दिलेला असतो त्याच्यावर सूड कसा उगवतो. आणि यासाठीचे राजकारण अश्या अंगानी ही कथा जाते. या सिरीजचे आत्तापर्यंत एकूण ५ सिझन आले आहेत.
 
 
- पद्माक्षी घैसास