करीना, सोनम, स्वरा आणि शिखाची मस्ती पाहून तुम्ही चकित व्हाल!
महा एमटीबी   25-Apr-2018
 
 
 
 
 
अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणी शिखा तालसानिया या चारही अभिनेत्रींची मस्ती पाहून तुम्ही सगळे चकित व्हाल. आता तुम्ही विचारात पडला असाल की या कुठे गेल्या होत्या जी इतकी मस्ती यांनी केली. मात्र या कुठे गेल्या नसून त्यांचा आगामी चित्रपट ‘विरे दी वेडिंग’मध्ये या चार मैत्रिणींची मज्जा, धम्माल दाखवण्यात आली असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 
 
 
 
 
आजच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मैत्रिणींचे सामान्य मुलीप्रमाणे आयुष्य, लग्न जमल्यावर तसेच लग्नाच्या आधी कश्या स्वरूपाचे असते आणि या सगळ्या गोंधळात या चौघींची मैत्री एकमेकांना कशी साथ देते आणि कशी धम्माल, मस्ती करते असे काहीसे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. काही गमतीदार वाक्यांचा उपयोग या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हा ट्रेलर आजच्या तरुण पिढीला जास्त आवडेल असे म्हणण्यास हरकत ठरणार नाही. 
 
 
 
 
दिग्दर्शक शशांक घोष याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून १ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चारही पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करीत आहे. चारही अभिनेत्रींचा चाहता वर्ग हा वेगवेगळा आहे. या चित्रपटाची वाट बऱ्याच दिवसांपासून चाहते पाहत आहेत. त्यामुळे हा चित्रपट किती आवडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.