श्रद्धा कपूर कोणाच्या हळदीची तयार करतेये, पहा हा नवा फोटो
महा एमटीबी   25-Apr-2018
 
 
 
 
 
 
अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाली अशी बातमी मिळत आहे. श्रद्धाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत म्हटले आहे, ‘यावर्षीचा सगळ्यात मोठा हळदीचा समारंभ पाहण्यास तयार रहा’ याचसोबत तिने एका पिवळ्या ड्रेससोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 
 
 
 
                              
 
 
बॉलीवूडमध्ये सध्या लग्न सराईचा मौसम सुरु आहे. नुकतेच अभिनेता मिलिंद सोमाण याने आपल्या प्रियसी अंकिता सोबत ‘सात फेरे’ घेतले. तसेच अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा हे देखील लग्न करणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता यापुढे बॉलीवूडमध्ये लग्न बंधनात कोण अडकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ज्या प्रकारच्या श्रद्धाच्या सोशल मीडियावर पोस्ट पडत आहेत. त्यावरून तर असे दिसते की, यावर्षी श्रद्धा आपले लग्न उरकणार आहे. 
 
 
 
 
मात्र श्रद्धाचा होणारा नवरा कोण? लग्न कधी करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर श्रद्धाच देवू शकते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना काही दिवस थांबावे लागणार आहे.