बाप रे बाप! संजय दत्तला होत्या ३०८ गर्लफ्रेंड...
महा एमटीबी   24-Apr-2018
 
 
 
 
 
रणबीर कपूर दिसतो हुबेहूब संजय दत्त... 
 
 
प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याला ३०८ गर्लफ्रेंड होत्या हे नुकतेच त्याच्या चाहत्यांना कळले आहे. याचे कारण म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट येणार असून या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. संजय दत्तची भूमिका प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर याने साकारली असून यात तो हुबेहूब संजय दत्त यासारखा दिसत आहे. 
 
 
 
 
 
संजय दत्तने त्याच्या जीवनात बरेच चढउतार पाहिले आहे. त्याने प्रसिद्धि, तुरुंगवास, विलासी जीवन, सामान्य जीवन या सगळ्या जीवनाचा अनुभव घेतला आहे. भूतकाळात ३०८ गर्लफ्रेंड असणारा संजय दत्त हा एकमेव अभिनेता आहे. इतक्या प्रमाणात विलासी आणि बिनधास्त जीवन संजय दत्तने जगले असल्याने त्याच्या जीवनावर हा चित्रपट काढण्यात आला आहे आणि या चित्रपटात रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
 
 
 
 
संजय दत्त त्याच्या आयुष्यात तुरुंगात देखील जावून आला मात्र चाहत्यांचे प्रेम काही त्याच्यावरून कमी झाले नाही म्हणून चाहत्यांना त्याचे व्ययक्तिक आयुष्य कळावे यासाठी संजय दत्तच्या जीवनावर हा चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी हे आहेत.