रा. स्व. संघामुळेच राष्ट्रभक्ती, समाजकार्याची प्रेरणा मिळाली : सुनील यादव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

 

 
 
रा. स्व.संघात जडणघडण झालेल्या माणसात देशभक्तीचे विचार भरलेले असतात. या विचारातूनच संस्कारित आणि कृतिशील व्यक्ती घडते. सुनील यादव याच विचारांनी प्रेरित झाले आणि समाजाची सेवा करता करता नगरसेवक म्हणून निवडूनही आले. आता पद केवळ नावाला तर समाजसेवा आयुष्यभराला हे व्रत त्यांनी जोपासले आहे. यादव यांची नुकतीच मुंबई के पूर्व प्रभागसमिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांची जडणघडण कशी झाली, याबाबत घेतलेला आढावा...
 

सुनिल यादव लहानपणापासून संघाशी जोडले गेले. संघात विविध जबाबदार्या पार पाडल्या. विहिंप, बजरंगदल या संघटनामध्येही काम केले. भाजपमध्ये बुथ प्रमुख पदापासून काम करण्यास सुरुवात केली. सन 2017 मध्ये पालिकेच्या प्रभाग क्र. 80 मधून ते निवडून आले. सन 1980 ते 2018 असा त्यांचा अडतीस वर्षांचा त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवास आहे. यादव यांची नुकतीच मुंबई के पूर्व प्रभागसमिती अध्यक्षपदी निवडही झाली आहे

यादव लहान असताना अंधेरीतील रमेश पार्कमध्ये खेळायला जायचे. त्यावेळी तेथील एका उद्यानात रा. स्व संघाची शाखा लागायची. या शाखेमध्ये मुले खेळायला यायची. तेथील वातावरण पाहून यादवही तेथे जायचे. पुढे ते संघाचे स्वयंसेवक झाले. संघात प्रवेश केल्यानंतर विविध जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या. गटनायक, गणशिक्षक, मुख्यशिक्षक, कार्यवाह, विहिंप अंधेरी संयोजक, बजरंगदल जिल्हा प्रमुख, कारसेवक झाले. कारसेवक असताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. संपूर्ण वंदेमातरम म्हणाले, म्हणून त्यांना उपायुक्ताने त्रास दिला होता. केस केलीगेली. ही केस साडेसात वर्षे चालली. पुढे निर्दोष मुक्तता झाली. हा प्रकार त्यांच्या मनाला लागला. त्यामुळे त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची भाषणे ते नियमित ऐकत असत. त्यांच्या भाषणांतून प्रेरित होऊन, यादव यांना राजकारणात येण्याची इच्छा झाली. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. पक्षात आल्यानंतर बुथप्रमुख पदापासून सुरुवात केली. एक एक करत अनेक पायर्या ते चढत गेले. वॉर्ड कमिटी सदस्य, दोनवेळा वॉर्ड अध्यक्ष झाले. भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री, भाजप जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, अंधेरी भाजप अध्यक्ष, भाजप जिल्हा महामंत्री तीनवेळा अशी पदे भूषविली. सन 2007 ला झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजप सेनेची युती होती. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु युती असतानाही शिवसेनेच्या एका तत्कालीन नगरसेविकेने बंडखोरी केली. त्यामुळे यादव यांचा एक हजार मतांनी पराभव झाला. 2014 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. त्यामध्ये त्यांचा साडे चार हजार मतांनी पराभव झाला. त्यांनी 2017 मध्ये पालिकेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी 2007 मतांनी विजय मिळवला. या वर्षासाठी त्यांची प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्वयंसेवक ते प्रभागसमिती अध्यक्ष हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्यावर 13 राजकीय केसेस झाल्या. त्यांना जाणीवपूर्वक 113 वेळा जेलमध्ये टाकण्यात आले. त्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. ओसामा बिन लादेन भारताचे तुकडे करू, असा म्हणाला तेव्हा त्याचा पुतळा त्यांनी जाळला होता. तर गोध्रा येथे कारसेवकांची हत्या झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण त्यांनी समाजकार्याचा वसा सोडला नाही. डगमगता समाजकार्य सुरुच ठेवले. ते समाजकार्य आजही सुरुच आहे. नुकतीच सुनील यादव यांची प्रभागसमिती अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. प्रभागसमिती कार्यालयात अनेक प्रश् घेऊन, नागरिक येतात. पाणी, कचरा, आरोग्य आदी प्रश्नांचा त्यामध्ये समावेश असतो. या सर्व प्रश्नांचा तात्काळ निपटारा केला जातो. कित्येक वेळा नागरिक स्वत: हून फोन करुन, आपल्या समस्येचे निवारण झाल्याचे सांगतात. अनेकांना राजकारणात येण्याची इच्छा असते. राजकारणात येऊ इच्छिणार्यांना सर्व समस्यांना तोंड देण्याची तयारी असायला हवी. अनेकदा मान अपमान होतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिस्थिती येते. यामध्ये सहनशीलता, धाडस असायला हवे असा सल्ला ते देतात.

अन् धक्का बसला

1992-93 ला दंगल सुरु होती. त्यावेळी जमावबंदीचे आणि दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश होते. मी मित्रांसोबत बाहेर होतो. . . खान नावाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते. त्यांनी येऊन माझ्या मित्राच्या कानाखाली मारली होती. आम्हाला संध्याकाळी कळाले की . . खान यांनी सात जणांना गोळ्या घातल्या आहेत. हे समजले तेव्हा धक्का बसला होता.

आई आणि संघाला श्रेय

समाजकार्य करत असताना अनेकदा पोलीस घरी यायचे, परंतु आई खंबीरपणे पाठीशी उभी राहायची. पोलिसांशी भांडायची. या प्रवासात आईने खूप साथ दिली, तर संघाच्या पदाधिकार्यांनी घरच्यांसारखी वागणूक दिली. त्याचे सर्व श्रेय आई आणि संघाला देईन त्यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचता आले.

नितीन जगताप

@@AUTHORINFO_V1@@