छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा येथे आज झालेल्या सीआरपीएफ जवान आणि नक्षलवादी यांच्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. आज सकाळपासून सीआरपीएफ जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु झाली. काही दिवसांपासून सीआरपीएफचे जवान या भागामध्ये नक्षलवाद्यांचा शोध घेत होते.
 
 
 
आज काही नक्षलवादी जवानांच्या नजरेस आल्यावर या दोघांमध्ये चकमक सुरु झाली. इतर काही महत्वाच्या भागांमध्ये देखील आता नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी बस्तर प्रांतामध्ये तब्बल ५९ नक्षलवादी समर्थक पोलिसांना शरण आले होते. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश होता. हे सर्व जण बस्तरमधील वेगवेगळ्या गावांमधून पोलिसांना शरण आले होते. 
 
 
 
नक्षलवादामुळे आपली आणि समाजाची काय हानी होऊ शकते हे सामान्य नागरिकांना आता कळू लागले आहे. त्यामुळे नागरिक आता स्वतःहून नक्षलवादाची साथ सोडत आहेत, हे एक अत्यंत चांगले चिन्ह असून यामुळे नक्षलवाद लवकरच नष्ट होईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@